RCB Storm Into IPL 2026 Final
esakal
RCB qualify for IPL 2026 final after beating Gujarat Titans: गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या फायनलमध्ये 'रॉयल' म्हणूनच धडक मारली. गुजरात टायटन्सला सर्व आघाड्यांवर चीतपट करताना RCB ने जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने वाटचाल केली. GT ला मात्र आला क्वालिफायर २ मध्ये खेळावे लागेल. एलिमिनेटरमधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या विजेत्यांशी ते भिडतील. कर्णधार रजत पाटीदार ( Rajat Patidar) आजच्या सामन्यातील नायक ठरला. त्याच्या नाबाद ९३ धावांनी GT ला हतबल केले.