IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Jitesh Sharma Wins Hearts With Marathi Response: आयपीएल २०२६ स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले. या विजेतेपदानंतर हर्षा भोगलेंशी बोलताना जितेश शर्माने मराठीतून उत्तर दिलं.
Jitesh Sharma - Harsha Bhogle | IPL 2026 Final | RCB vs GT

Jitesh Sharma - Harsha Bhogle | IPL 2026 Final | RCB vs GT

Sakal

Updated on

RCB vs GT, Final Marathi News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या आयपीएल २०२६स्पर्धेच्या (IPL 2026) अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्स संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. बंगळुरूने गेल्यावर्षी १८ वर्षांची प्रतिक्षा संपवून पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

त्यानंतर आता रजत पाटिदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वात बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले. या विजेतेपदानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. तसेच खेळाडू आपापल्या भावना व्यक्त करतानाही दिसले, यावेळी बंगळुरूचा उपकर्णधार जितेश शर्माने (Jitesh Sharma) मराठी प्रतिक्रिया दिल्याने अनेकांचे लक्ष वेधले.

Jitesh Sharma - Harsha Bhogle | IPL 2026 Final | RCB vs GT
IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com