IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

Vaibhav Sooryavanshi IPL 2026 Awards and Prize money रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ स्पर्धा जिंकल्यानंतर पुरस्कार सोहळा झाला. यामध्ये मात्र १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा बोलबाला राहिला. त्याने ऑरेंज कॅपसह ५ मोठे पुरस्कार जिंकले.
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 Awards

Vaibhav Sooryavanshi IPL 2026 Awards

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेची (IPL 2026) अखेर रविवारी सांगता झाली. अहमदाबादला झालेला अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला ५ विकेट्सने पराभूत करत जिंकला.

यासह रजत पाटिदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले. त्यामुळे बंगळुरू तिसराच संघ ठरला, ज्यांनी सलग दोन हंगामात विजेतेपद जिंकले. याआधी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांनी सलग दोन वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

असं असलं तरी अंतिम सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मात्र १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) सर्वांचे लक्ष वेधले. त्याने एक-दोन नाही, तर तब्बल ५ पुरस्कार (5 Awards) जिंकले.

Vaibhav Sooryavanshi IPL 2026 Awards
IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com