RCB vs DC Live: विराट कोहली अपयशी ठरला, वैभव सूर्यवंशीचा 'पॉवर'फुल विक्रम थोडक्यात वाचला! १५ वर्षीय फलंदाज वरचढ ठरला

IPL 2026 RCB vs DC Marathi Cricket News: बंगळुरू विरुद्ध दिल्ली सामन्यात सर्वांचे लक्ष Virat Kohli याच्याकडे होते. आयपीएल २०२६ मध्ये आजच्या सामन्यात त्याला ऑरेंज कॅप पुन्हा आपल्या नावावर करण्याची संधी होती आणि १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा विक्रमही मोडता आला असता. पण, तो अपयशी ठरला.
Virat Kohli narrowly missed surpassing Vaibhav Sooryavanshi’s powerplay record in IPL 2026

Virat Kohli narrowly missed surpassing Vaibhav Sooryavanshi’s powerplay record in IPL 2026

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Marathi Update: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गुणतालिकेसाठी महत्त्वाचा आहे. RCB सलग दोन सामने जिंकून, तर DC सलग दोन सामने गमावून आज एम चिन्नास्वामी स्टेडियमवर उतरले आहेत. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि दोन्ही संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. चिन्नास्वामी स्टेडियमवरील RCB चा हा १०० वा सामना आहे आणि आयपीएलमध्ये एकाच मैदानावर शतकी सामना खेळणारा हा पहिलाच संघ ठरला. यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने इडन गार्डनवर ९८ सामने खेळण्याचा विक्रम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com