BHUVNESHWAR KUMAR DISMISSES ROHIT AND SURYAKUMAR, CLAIMS PURPLE CAP
esakal
Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Marathi Updates: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर विजयाशिवाय पर्याय नाही. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांची दैना उडाली. भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) मुंबईला धक्क्यांमागून धक्के दिले. भुवीने सलग दोन चेंडूंवर रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना माघारी पाठवून डावातील तिसरी विकेट मिळवली. भुवी २० विकेट्ससह आयपीएलच्या या पर्वात पर्पल कॅपचा मानकरी ठरला. शिवाय त्याने काही विक्रमही नावावर केले.