11 Fours, 2 Sixes... रिंकू सिंगचं सलग दुसरं शतक! आता तरी टीम इंडियात पुन्हा जागा मिळणार का?

Rinku Singh Ranji Trophy Century: रिंकू सिंगने रणजी ट्रॉफीमध्ये सलग दुसरे शतक केले आहे. त्याने दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच दिवशी शतक केले. त्यामुळे त्याने आता भारतीय संघात पुन्हा जागा मिळवण्यासाठी दावेदारी ठोकली आहे.
Rinku Singh Ranji Century

Rinku Singh Ranji Century

Sakal

Updated on: 

Uttar Pradesh vs Goa, Ranji Trophy Match: भारताचा फलंदाज रिंकू सिंग सध्या दमदार फॉर्ममध्ये असून त्याने सलग दुसरे शतक रणजी ट्रॉफी २०२६-२७ हंगामात झळकावले आहे. सध्या रणजी ट्रॉफीची दुसरी फेरी सुरू असून या फेरीत उत्तर प्रदेशचा सामना कानपूरमध्ये गोवाविरुद्ध सुरू आहे.

या सामन्याच्या पहिल्याच दिवशी (रविवार, १८ ऑक्टोबर) उत्तर प्रदेशसाठी रिंकू सिंग (Rinku Singh) संकटमोचक ठरला. त्याने पहिल्याच दिवशी गोव्याविरुद्ध शतक केलं, त्यामुळे उत्तर प्रदेशला २०० धावांचा टप्पाही ओलांडता आला.

Rinku Singh Ranji Century
RANJI TROPHY: न्यूझीलंड दौऱ्याआधी शुभमन गिलचा रणजीत फ्लॉप शो! १ रनवर बोल्ड करणारा अजय मंडल आहे तरी कोण?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com