
भारतीय संघाने इंग्लंडला कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात चांगलंच सतावलं आहे. सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेला शुक्रवारपासून (२० जून) सुरू झाला आहे.
या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी पहिल्या दिवशी शतके केली होती. आता दुसऱ्या दिवशी रिषभ पंतनेही त्याचं शतक पूर्ण करत इंग्लंडला मोठा दणका दिला आहे.