

Rishabh Pant | LSG vs KKR IPL 2026
Sakal
IPL 2026, LSG vs KKR: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (२६ एप्रिल) झालेला दुसरा सामना अत्यंत रोमांचक झाला. एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले.
लखनौचा हा हंगामातील सहावा, तर सलग ५ वा पराभव होता. याशिवाय घरच्या मैदानातील सलग आठवा पराभव ठरला. त्यामुळे सध्या लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) मार्ग आता बराच कठीण झाला आहे. त्यांनी ८ सामन्यांपैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. या पराभवानंतर लखनौचा कर्णधार रिषभ पंतदेखील हतबल झाला होता.