
सहा महिन्यांआधी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत होता. त्यावेळी एका सामन्यात मोक्याच्या क्षणी चुकीचा फटका मारून रिषभ पंत बाद झाला होता.
त्यामुळे त्याचा शॉट पाहून समालोचन करणाऱ्या सुनील गावसकरांचा राग अनावर झाला होता आणि त्यांनी त्याला 'स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड' म्हणत सुनावलं होतं. त्याची बरीच चर्चा झाली होती. पण सहा महिन्यांनी गावसकरांना त्यांचे शब्द बदलण्यास रिषभ पंतने भाग पाडले.