
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (९ मार्च) दुबईत होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताचा कर्णधार रोहित शर्माने धुंवाधार फलंदाजी केली आहे. त्याने आक्रमक खेळत अर्धशतकासह खास विक्रमही केला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल यांची जोडी मैदानात उतरली.