

Rohit Sharma and Gautam Gambhir Video
Sakal
England vs India 3rd ODI at Lord's: भारताचा वनडे संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून रविवारी (१९ जुलै) वनडे मालिकेतील शेवटचा सामना लॉर्ड्सवर खेळायचा आहे. या मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी असून लॉर्ड्सवर होणारा तिसरा सामना निर्णायक आहे. पण त्याआधीच धक्कादायक रिपोर्ट्स समोर आले. रोहित शर्मा (Rohit Sharma) लॉर्ड्स वनडे सामन्यानंतर निवृत्ती घेण्याची चर्चा सध्या जोरदार होत आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि भारतीय संघव्यवस्थापन रोहितचा २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठी विचार करत नसल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे रोहित लॉर्ड्स वनडेनंतर निवृत्ती घेईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.