

BCCI Awards | Champions Trophy
Sakal
Rohit Sharma and Virat Kohli Skip BCCI Annual Awards: नवी दिल्लीमध्ये बीसीसीआयचा नमन वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्यात २०२४-२५ या हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या क्रिकेटपटूंचा आणि संघांचा गौरव करण्यात आला.
यंदाचा पुरस्कार खास होता, कारण २०२४-२५ हंगामात पुरुष, महिला आणि ज्युनियर गटात भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळाले. त्यामुळे या सर्व विश्वविजेत्यांचा सन्मान झाला. मात्र यात भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची गैरहजेरीही चर्चेचा विषय ठरली.