फॅन्ससोबत धक्काबुक्की नाय... रोहित शर्मा बॉडिगार्डवर चिडला; मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं? मन जिंकणारा Video

Rohit Sharma fumes at bodyguard : मुंबई विमानतळावर चाहत्यांनी सेल्फीसाठी रोहित शर्माला घेरले होते. यावेळी बॉडिगार्डच्या एका कृतीवर रोहित शर्मा चांगलाच तापला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Airport Video

Rohit Sharma Airport Video

Sakal

Updated on

Rohit Sharma Viral Video: भारताचा दोन आयसीसी ट्रॉफी विजेता कर्णधार रोहित शर्माची लोकप्रियता लपून राहिलेली नाही. त्याचे करडो फॅन्स आहेत, जे केवळ भारतातच नाही, तर क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांमध्ये दिसतात. त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

त्यातही त्याच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळालीच, तर त्यांच्यासाठी तो क्षण कायमस्वरुपी लक्षात राहणारा असतो. पण अनेकदा स्टार खेळाडूंभोवती बॉडिगार्ड (Bodyguard) दिसतात, जे चाहत्यांना फारसे त्यांच्याजवळ सुरक्षेच्या कारणाने येऊ देत नाहीत. नुकताच असाच एक प्रकार रोहित शर्मासोबत झाला. पण त्याने त्यावेळी जे केले, ज्याने अनेकांची मनं जिंकली आहेत.

Rohit Sharma Airport Video
IND vs AFG: Rohit Sharma ने इतिहास घडवला! ३७ वर्षे जूना विक्रमही मोडला अन् 'असा' पराक्रम करणारा पहिला भारतीय ओपनर ठरला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com