

Rohit Sharma Mumbai Indians Captain
Sakal
Mumbai Indians bring back Rohit Sharma as captain: मुंबई इंडियन्सने काही दिवसांपूर्वीच गेली तीन वर्षे कर्णधार राहिलेल्या हार्दिक पांड्याचे पंजाब किंग्ससोबत अर्शदीप सिंगच्या बदलल्या ट्रेड केले आहे. त्यामुळे त्यांच्या संघात कर्णधाराची जागा रिकामी झाली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण होणार याबाबत बऱ्याच चर्चा होत होत्या.
अखेर मुंबई इंडियन्सने ही प्रतिक्षा शुक्रवारी संध्याकाळी पावणे सहाच्या ठोक्याला संपवली आहे. मुंबईने आयपीएल २०२७ साठी रोहित शर्माची पुन्हा एकदा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.