
Four Indian Players Selected For ICC Womens T20I Team 2024: काल आयसीसीने जाहीर केलेल्या २०२४च्या सर्वोत्तम कसोटी संघात भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा व विराट कोहली यांना स्थान मिळालेलं नव्हते. पण आज आयसीसीने २०२४च्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, ज्यामध्ये रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. रोहितच्या नेतृत्वात भारताने २०२४ च्या वर्ल्ड कपवर नाव कोरले.२०२४ मधील कामगिरीवर आयसीसीने सर्वोत्तम संघ जाहीर केला. ज्यामध्ये भारताच्या एकूण ४ खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मासह, अष्टपैलू हार्दिक पांड्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग यांचीही संघात निवड करण्यात आली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड २०२४ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. रोहितने वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध ९२ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. वर्ल्ड कपनंतर रोहितने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितने यावर्षी एकूण ११ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ४२ च्या सरासरीने व १६०.१६ च्या स्ट्राईक रेटने ३७८ धावा केल्या. यामध्ये त्याची १२१ ही सर्वाधिक धावसंख्या राहिली आहे.