... तर रोहित शर्मासाठी बंद होणार World Cup 2027 चे दरवाजे? BCCI ला सतावतेय 'ही' चिंता

Rohit Sharma Fitness World Cup 2027: बीसीसीआय आता २०२७ वनडे वर्ल्ड कपच्या तयारीला लागले आहेत. वनडे संघाची संघबांधणीला सुरुवात झाली आहे, पण याचवेळी रोहित शर्माबाबत मोठी चिंता बीसीसीआयला सतावत आहे.
Rohit Sharma

Rohit Sharma

Sakal

Updated on

Rohit Sharma Marathi News: मंगळवारी (१९ मे) बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी आणि वनजे मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली. मंगळवारी निवड समितीच्या बैठकीत वनडे वर्ल्ड कप २०२७ (World Cup 2027) स्पर्धेला लक्षात घेऊनही काही निर्णय घेण्यात आले आहे.

वनडे संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचीही निवड झाली आहे. मात्र रोहितच्या फिटनेसवर (Fitness) सध्या प्रश्नचिन्ह आहे. पण आता अशीही माहिती समोर येत आहे की बीसीसीआयला (BCCI) रोहित वनडे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेपर्यंत फिट असेल की नाही, याबाबत शंका आहे.

Rohit Sharma
India ODI Schedule Till 2027 World Cup: विराट, रोहित शर्माचा जबरदस्त फॉर्म; २०२७ च्या वर्ल्ड कपपर्यंत किती सामने खेळणार पाहा...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com