

Ajit Agarkar - Rohit Sharma
Sakal
BCCI Meeting Updates Marathi News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीसाठी भारतीय संघाचे कर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर, बीसीसीआयचे पदाधिकारी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचा सहभाग असल्याचे अपेक्षित होते. परंतु, अजित आगरकर या बैठकीसाठी उपस्थित नव्हते हा चर्चेचा मुद्दा राहिला. पण बाकी सर्व महत्त्वाच्या व्यक्ती बैठकीसाठी उपस्थित होत्या.
खरंतर काही दिवसांपूर्वीच अशी चर्चा होती की या बैठकीत अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या कार्यकाळाबद्दल चर्चा होईल. परंतु, तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी सांगितले. आगरकर त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे या बैठकीसाठी उपस्थित नसल्याचे समजत आहे.