

Rohit Sharma | Mumbai Indians
Sakal
Mumbai Indians Marathi News: पाचवेळचे आयपीएल विजेते मुंबई इंडियन्ससमोर सध्या मोठा पेच आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पहिल्या ४ सामन्यांमधील एकच सामना जिंकला आहे. त्यांनी गेले सलग तीन सामने पराभूत झाले आहेत.
त्यातच त्यांचा सर्वात अनुभवी खेळाडू रोहित शर्मा दुखापतग्रस्त (Rohit Sharma Injury) झाला आहे. मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पाचवा सामना गुरुवारी (१६ एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. पण हा सामना रोहित शर्मा खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.