
भारतीय क्रिकेट संघाला आयपीएल २०२५ स्पर्धेनंतर जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्याआधी भारतीय अ संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल आणि प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे.
या दौऱ्यासाठी बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. असे समजत आहे की भारतीय संघासाठी आणि भारत अ संघासाठी ३५ खेळाडूंची नावं बीसीसीआयने शॉर्टलिस्ट केली आहेत. या ३५ जणांच्या यादीत रोहित शर्माचे देखील नाव आहे.