RCB win by 5 wickets and claim their second IPL title. Ee Sala Kooda Cup Namdu!
esakal
RCB retain IPL title in 2026 final: आम्ही, गतविजेत्याच्या थाटातच खेळणार... कर्णधार रजत पाटीदार याने त्याचे विधान खरे ठरवले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB ) सर्व आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी करून जेतेपद कायम राखले. चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांच्यानंतर जेतेपद राखणारा RCB हा आयपीएल इतिहासातील तिसरा संघ ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL 2026 Final मध्ये त्यांनी विराट कोहलीच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सचा सहज पराभव केला. एकतर्फी विजयासह RCB ने त्यांचे दुसरे आयपीएल जेतेपद नावावर केले.