Yashasvi Jaiswal leads Rajasthan Royals against Gujarat Titans
esakal
Rajasthan Royals vs Gujarat Titans Marathi Updates: राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्सन, हे दोन्ही संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सध्या एकाच बोटीतून प्रवास करत आहेत. दोन्ही संघांना १० सामन्यांत ६ विजय मिळवता आले आहेत आणि प्ले ऑफसाठी त्यांना उर्वरित सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. GT ने मागील तीन सामने जिंकून स्पर्धेत पुनरागमन केले आहे, तर RR ला मागील पाच सामन्यांत तीन पराभव पत्करावे लागले आहे. त्यामुळे RR साठी ही चिंताजनक बाब आहे. त्यात आजच्या सामन्यात राजस्थानचा संघ नियमित कर्णधार रियान पराग ( Riyan Parag) याच्याशिवाय मैदानावर उतरला आहे. यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal Captain) आजच्या सामन्यात नेतृत्व करतोय.