

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Marathi Updates: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना ४५ मिनिटांच्या विलंबानंतर अखेर सुरू झाला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या १६ व्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. गुवाहाटीचे हवामान पाहता, याची सामन्याची षटक संख्या कमी होईल असे वाटले होते. पण, तसे झाले नाही. RR चा कर्णधार रियान पराग याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस झाल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.