

Vaibhav Suryavanshi
esakal
Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Marathi Updates: वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi) पुन्हा एकदा समोर कोणताही गोलंदाज असला तरी घाबरणार नाही, हे सिद्ध केले. त्याने जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार यांची धुलाई करताना १५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. राजस्थानसाठी हे संयुक्तपणे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. राजस्थानने ६ षटकांत १ बाद ९७ धावा चोपल्या. त्यात वैभवच्या १८ चेंडूंत ५७ धावा होत्या आणि त्याने ८ चौकार व ४ षटकार लगावले आहेत.