
Vijay Hazare Trophy Semifinal: बीसीसीआयच्या निवड समितीला अद्याप आगामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची निवड करायची आहे. अशातच भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी ही वनडे स्पर्धाही होत आहे.
या स्पर्धेवरही अनेकांचे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने लक्ष होते. या स्पर्धेत विदर्भाचे नेतृत्व करणाऱ्या करूण नायरने लक्षवेधी कामगिरी करण्यासोबतच भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्येही महाराष्ट्राविरुद्ध वादळी खेळ केला आहे.