Ruturaj Gaikwad News: भारतीय संघाला बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेनंतर आता तीन सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. ६ ऑक्टोबर रोजी या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी गेल्या आठवड्यात बीसीसीआय निवड समितीने भारतीय संघाची निवड केली आहे.
या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋषभ पंत अशा काही अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना या संघात संधी मिळाली आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर हार्दिक पांड्याही भारतीय संघात पुनरागमन करत आहे.
मात्र, या टी२० मालिकेसाठी २७ वर्षीय ऋतुराज गायकवाड याची निवड न झाल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ऋतुराजची या मालिकेसाठी निवड करण्यापेक्षा १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या इराणी कप स्पर्धेसाठी त्याची शेष भारत संघाच्या कर्णधापदी निवड करण्यात आली.
तसेच ११ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी ऋतुराजला महाराष्ट्राचाही कर्णधार करण्यात आली आहे.
दरम्यान, यानंतर ऋतुराजला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे काय, अशा चर्चा होत आहेत. मात्र आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार ऋतुराजला बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याकडे भारतीय संघव्यवस्थापन कसोटीमध्ये सलामीवीराच्या भूमिकेसाठी पाहात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सुत्राने सांगितले आहे की संघव्यवस्थापन त्याला आगमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कलोटी मालिकेसाठी तयार करत आहेत.
या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासाठी एक पर्याय म्हणून तिसरा सलामीवीर ही जबाबदारी ऋतुराजला दिली जाऊ शकते. त्यामुळे त्याला त्यासाठी तयार केले जात आहे. त्यासाठीच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी सामने खेळावेत अशी संघव्यवस्थापनाची इच्छा आहे.
दरम्यान, ऋतुराजला बांगलादेशविरुद्ध टी२० संघात स्थान न दिल्याबद्दल त्याचा महाराष्ट्र संघातील संघसहकारी नौशाद शेख याने प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट याबाबत त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याने याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनलाही विनंती केली आहे की याबाबत बीसीसीआयला त्यांनी प्रश्न विचारायला हवेत.
बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ -
सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.