
भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतवर नुकतीच केरळ क्रिकेट असोसिएशनने तीन वर्षे बंदीची कारवाई केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी संजू सॅमसनला भारतीय संघात संधी न मिळाल्याने श्रीसंतने केरळ क्रिकेट असोसिएशनवर निशाणा साधला होता.
त्यामुळे केरळ क्रिकेट असोसिएशनविरुद्ध त्याने चुकीचे आणि अपमानजनक विधान केल्याप्रकारणी त्याच्यावर बंदीची कारवाई झाली. दरम्यान, केरळ क्रिकेट असोसिएशनने असेही स्पष्ट केले की सॅमसनला पाठिंबा दिला म्हणून नाही, तर असोसिएशनविरुद्ध दिशाभूल करणारे आणि अपमानजनक विधान केल्याने ही कारवाई केली.
त्याला कारवाईआधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पण त्याने त्यावर प्रतिक्रिया न दिल्याने त्याच्यावर कारवाई झाली. आता या प्रकरणात श्रीसंतनेही प्रतिक्रिया दिली असून त्याने भलीमोठी सोशल मिडिया पोस्ट केली आहे.