

SA20 India Day 2025
Sakal
दक्षिण आफ्रिकेची प्रमुख टी 20 लीग असलेल्या एसए20 ला भारतात वाढती लोकप्रियता आणि चाहतावर्ग मिळत असल्याचा अनुभव येत आहे. मुंबईत पार पडलेल्या यशस्वी ‘एसए20 इंडिया डे 2025’ कार्यक्रमातून हे दिसून आले. या कार्यक्रमाने लीग आणि भारतीय उपखंडातील वाढत्या संबंधांचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठळकपणे पुढे आला आणि 26 डिसेंबर ते 25 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या सीझन 4 साठी हा कार्यक्रम लॉंचपॅड ठरला.