Sachin Tendulkar Invites PM Modi for Son Arjun's Wedding
Sakal
Cricket
Arjun Tendulkar Wedding: अर्जुनच्या लग्नासाठी PM मोदीनांही आमंत्रण; स्वत: वरबाप सचिन तेंडुलकरने केली पोस्ट
Sachin Tendulkar invites PM Modi for Arjun & Saaniya wedding: अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे आमंत्रण सचिन तेंडुलकरने सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना दिले आहे.
Sachin Tendulkar invites PM Modi for Arjun & Saaniya wedding: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याचे सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाची आमंत्रणंही देण्यास सुरुवात झाली आहे.
नुकतेच सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सहकुटुंब जाऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊ त्यांना या लग्नाचे आमंत्रण (Wedding Invitation) दिले आहे.

