
दक्षिण आफ्रिका संघ कसोटी क्रिकेटमधील नवा जगज्जेता आहे. लॉर्ड्सवर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली.
यासह दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे या विजेतेपदानंतर भरभरून कौतुक झाले. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही दक्षिण आफ्रिका संघाचे कौतुक केले आहे.