T20 WC, IND vs PAK: 'अभिषेक शर्माला खेळवा, कारण आम्हाला...', पाकिस्तानी कर्णधाराचं थेट आव्हान; हँडशेकबद्दलही बोलला

Salman Agha on Abhishek Sharma and Handshake Controversy: भारताविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने अभिषेक शर्माबद्दल आणि हस्तांदोलनाबाबतही भाष्य केले.
Salman Agha on Abhishek Sharma and Handshake Controversy

Salman Agha on Abhishek Sharma and Handshake Controversy

Sakal

Updated on

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सामना रविवारी (१५ फेब्रुवारी) खेळवला जाणार आहे. या सामन्याबाबत स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आधीपासूनच चर्चा आहे. आधी पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर त्यांनी हा निर्णय बदलला.

त्यामुळे भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. यादरम्यान सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद झाली, ज्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा (Salman Agha) उपस्थित होता. यावेळी त्याने अभिषेक शर्माबाबतही (Abhishek Sharma) भाष्य केले.

<div class="paragraphs"><p>Salman Agha on Abhishek Sharma and Handshake Controversy</p></div>
T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com