संजू सॅमसनने केरळ क्रिकेट लीगमध्ये ५ सामन्यांत २८५ धावा करून २२ षटकारांचा विक्रम केला.
कोची ब्लू टायगर्सकडून खेळताना त्याने सरासरी ७१.२५ व स्ट्राईक रेट १८२.६९ राखला.
शुभमन गिलच्या पुनरागमनामुळे संजूचे आशिया कपमधील प्लेइंग इलेव्हन स्थान धोक्यात आले आहे.
Sanju Samson Asia Cup 2025 squad inclusion chances : यष्टिरक्षक- फलंदाज संजू सॅमसनने केरळ क्रिकेट लीगमध्ये (KCL) आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोची ब्लू टायगर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना, संजूने सलामीवीर म्हणून २८५ धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने ५ सामन्यांमध्ये २२ षटकार मारून सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या लीगमध्ये त्याने २१ चौकारांसह फटकेबाजी केली आणि त्याची सरासरी ७१.२५ असून त्याचा स्ट्राईक रेट १८२.६९ इतका प्रभावी राहिला.