

Sanjay Manjrekar reacting to Team India performance and criticising BCCI after the England series
Sakal
Sanjay Manjrekar’s Strong Message to BCCI: भारतीय टी२० संघाने मार्च २०२६ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. पण त्यानंतर बराच बदल टी२० संघात झाला. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) आणि उपकर्णधार म्हणून तिलक वर्माला (Tilak Varma) नेमण्यात आले. मात्र या नव्या नेतृत्वाखाली भारतीय टी२० संघाची सुरुवात निराशाजनक राहिली.
जूनच्या अखेरच भारतीय संघाला आयर्लंडकडून २-० असा पराभव स्वीकारावा लागला, तर इंग्लंडविरुद्ध जुलैमध्ये ४-० असा पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर सध्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकावे अशी मागणीही होत आहे.
मात्र माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी याउलट सल्ला दिला असून त्यांनी म्हटलं आहे की समस्या खूप खोलवर रुजलेली आहे.