
Australia vs India 3rd Test: ब्रिस्बेनमधील द गॅबा मैदानावर होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजीची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. भारतीय संघाची फलंदाजी कोलमडण्याची ही पहिलीच वेळ नाही.
चालू बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या सामन्यात दुसऱ्या डावाचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजी फळी फार खास काही या मालिकेत अद्याप काही करू शकलेले नाही. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात ४४५ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या दिवशी (१६ डिसेंबर) भारतीय संघ फलंदाजीला उतरला.