इंडियन प्रीमिअर लीग 2026 पूर्वी संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स सोडण्याची तयारी केली असून तो CSK कडून खेळू इच्छितो.
माजी फलंदाज आकाश चोप्रा यांच्या मते, संजूच्या या निर्णयामागे वैभव सूर्यवंशी हा मोठा कारण आहे.
वैभव सूर्यवंशीने 2025 आयपीएल पदार्पणात भारताच्या वतीने सर्वात वेगवान T20 शतकाचा विक्रम केला.
Vaibhav Suryavanshi’s batting shocks Sanju Samson : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ पूर्वी फ्रँचायझींमध्ये पु्न्हा एकदा बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळणार आहेत. लोकेश राहुल दिल्लीची साथ सोडून कोलकाताचा हात धरणार असल्याची चर्चा असताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानेही त्याच्या मनाची तयारी केली आहे. तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याने RR कडे त्याला रिलीज करण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येत आहे. अशात संजूच्या फ्रँचायझी सोडण्यामागे वैभव सूर्यवंशी कारण असल्याचा दावा माजी फलंदाज आकाश चोप्राने केला आहे.