केरळ क्रिकेट लीगमध्ये संजू सॅमसनने ५१ चेंडूत १२१ धावांची तुफानी खेळी केली.
Aries Kollam Sailors विरुद्ध खेळताना संजूने ४२ चेंडूत शतक झळकावले.
१४ चौकार व ७ षटकारांसह त्याने सामना जिंकून टीम इंडियाच्या सलामीसाठी दावा केला.
Will Sanju Samson open for India in Asia Cup 2025 : आता तरी संजू सॅमसनला आशिया चषक स्पर्धेत सलामीला खेळवा... केरळ क्रिकेट लीगमध्ये संजूने तिसऱ्या, चौथ्या अगदी सहाव्या क्रमांकावर खेळून टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा पक्की करण्यासाठी प्रयत्न केले. पण, त्याला यश आले ते सलामीलाच... काल संजूने कोची ब्ल्यू टायगर्सकडून खेळताना Aries Kollam Sailors विरुद्ध खणखणीत शतक झळकावले. KCL मधील वेगवान शतकाचा विक्रम संजूने नावावर करताना टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढवली आहे.