IND vs AUS Controversy: 'गौतम गंभीरचा फोन आलेला...' ड्रेसिंग रूम लीक वादावर सर्फराज खानचा मोठा खुलासा

Sarfaraz Khan Speaks Out on Dressing Room Leak Controversy : २०२४-२५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान गौतम गंभीर भारतीय खेळाडूंवर चिडल्यानंतरचे संभाषण लीक झाले होते. त्यावेळी सर्फराज खानचं नाव चर्चेत होतं. याबाबत आता सर्फराज खाननेच खुलासा केला आहे.
Sarfaraz Khan | Gautam Gambhir | Border-Gavaskar Trophy |

Sarfaraz Khan revealed how Gautam Gambhir stood by him during the dressing room leak controversy.

Sakal

Updated on: 

भारतीय कसोटी संघासाठी २०२४-२५ हंगाम अत्यंत संघर्षमय होता. मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश स्वीकारल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ कसोटी मालिकेमध्येही (BGT) पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघातील अंतर्गत वादाचीही बरीच चर्चा झाली होती.

यादरम्यानच मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटीतील पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय खेळाडूंना चांगलेच सुनावले होते. याबाबतची माहिती बाहेर लीकही झाली होती, ज्यावरून क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.

यात भारताचा फलंदाज सर्फराज खानचेही नाव आले होते. पण त्याने हे आरोप फेटाळून लावले असून गौतम गंभीरबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.

Sarfaraz Khan | Gautam Gambhir | Border-Gavaskar Trophy |
IND vs NZ, 1st Test: केएल राहुलचं धडाकेबाज शतक! SENA देशात 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय
Loading content, please wait...