Sarfaraz Khan ला उपांत्यपूर्व सामन्यापूर्वीच करावं लागलं हॉस्पिटलमध्ये दाखल, संघाला मोठा धक्का; नेमकं काय घडलं?

Sarfaraz Khan Hospitalized with Viral Fever: सर्फराज खानला उपांत्यपूर्व सामन्यापूर्वीच व्हायरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे.
Sarfaraz Khan | Mumbai

Sarfaraz Khan | Mumbai

Sakal

Updated on

Sarfaraz Khan Hospitalized with Viral Fever: दमदार फॉर्ममध्ये असलेल्या सर्फराज खानला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजत आहे. सर्फराज सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेसाठी मुंबई संघाचा भाग आहे. मुंबईने या स्पर्धेत उपांत्यपूर्वी फेरीत प्रवेश केला आहे.

उपांत्य फेरीचे सामने शुक्रवारपासून (६ फेब्रुवारी) सुरू होणार आहेत. मुंबईला तुल्यबळ असलेल्या कर्नाटक संघाशी दोन हात करायचे असून हा सामना बीकेसीमधील शरद पवार क्रिकेट ऍकेडमीमध्ये होणार आहे.

मात्र, सर्फराज खान (Sarfaraz Khan) त्यापूर्वीच आजारी पडला आहे. त्याला ताप भरला आहे. त्यामुळे तो उपांत्यपूर्व फेरीत मुंबईसाठी (Mumbai) खेळणार की नाही यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

<div class="paragraphs"><p>Sarfaraz Khan | Mumbai</p></div>
Ranji Trophy: अंतिम ८ संघ ठरले; महाराष्ट्र, विदर्भ स्पर्धेतून बाहेर, तर मुंबईची उपांत्यपूर्व फेरीत धडक; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com