

Mumbai Cricket Team
Sakal
Ranji Trophy 2025-26 Quarter Final Schedule: रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील साखळी फेरी नुकतीच संपली असून आता स्पर्धा अखेरच्या टप्प्याकडे झुकत आहे. या स्पर्धेतील अंतिम ८ संघ आता निश्चित झाले आहेत. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत आता कोणता संघ कोणाविरुद्ध खेळणार हे, हे देखील स्पष्ट झाले आहे.
रणजी ट्रॉफी एलिटमध्ये (Ranji Trophy Elite) चार ग्रुप होते. प्रत्येक गटात ८ संघ होते. या प्रत्येक गटातील अव्वल दोन संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.