T20 World Cup: बांगलादेशचा पत्ता कट झालाच! वर्ल्डकपमध्ये भारतात त्यांच्या जागी हा संघ खेळणार, ICC कडून शिक्कामोर्तब

Scotland Replaces Bangladesh in T20 World Cup 2026: बांगलादेश भारतात टी२० वर्ल्ड कप २०२६ खेळण्यासाठी येणार नसल्यावर ठाम आहे. त्यामुळे आयसीसीने त्यांच्या जागेवर दुसऱ्या संघाला संधी दिली असून त्यापुढील प्रक्रियाही झाली आहे.
Bangladesh Cricket Team

Bangladesh Cricket Team

Sakal

Updated on

Scotland Replaces Bangladesh in T20 WC: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील बिघडलेल्या संबंधांचा परिणाम क्रिकेट क्षेत्रावरही झाला आहे. बांगलादेश भारतात टी२० वर्ल्ड कप २०२६ खेळण्यासाठी येणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) त्यांच्याऐवजी स्कॉटलंडची (Scotland) बदली संघ म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

७ फेब्रुवारी ते ८ मार्च यादरम्यान भारत आणि श्रीलंका या दोन देशात टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup 2026) खेळलला जाणार होता. मात्र मुस्तफिजूर रेहमानला आयपीएल २०२६ मधून बीसीसीआयने (BCCI) काढल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून (BCB) नाराजी व्यक्त करण्यात आली.

तसेच त्यांनी सुरक्षेच्या कारणाने टी२० वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नसल्याची भूमिका मांडत ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. मात्र आयसीसीने वेळापत्रक आधीच निश्चित झाल्याने ठिकाण बदलण्यास नकार दिला होता.

<div class="paragraphs"><p>Bangladesh Cricket Team</p></div>
Big Breaking : जय शाह बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम करणार ! प्रचंड संतापलेत... T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री; घोषणा लवकरच...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com