IPL 2026 News: अरे त्या, दीपक चहर, शार्दूल ठाकूरला पैसे द्या अन् घरी पाठवा! Mumbai Indians वर दिग्गजाचा पारा चढला; म्हणाले...

Deepak Chahar Shardul Thakur performance IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू K Srikkanth यांनी संघावर जोरदार हल्ला चढवला आहे. विशेषतः दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर यांच्या कामगिरीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Deepak Chahar Shardul Thakur performance IPL 2026

Deepak Chahar Shardul Thakur performance IPL 2026

esakal

Updated on

Why Srikkanth wants Deepak Chahar and Shardul Thakur dropped? मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. १९व्या पर्वातील पहिल्या पाच सामन्यांत त्यांना फक्त एक विजय मिळवता आला आणि त्यांना पराभवाचा चौकार पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी विभागावर जोरदार टीका होताना दिसतेय. जगातील नंबर वन गोलंदाज जसप्रीत बुमराही पाच सामन्यांत एकही विकेट घेऊ शकलेला नाही. शार्दूल ठाकूर व दीपक चहर, यांनी बऱ्याच धावा दिल्या आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांनी या दोन्ही गोलंदाजांना घरी पाठवण्याचा सल्ला MI ला दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com