Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Shafali Varma - Smriti Mandhana Century Partnership Records: आशिया कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी शतकी भागीदारी केली. त्यांनी तीन विश्वविक्रमही केले आहेत.
Shafali Varma - Smriti Mandhana | Women's Asia Cup Final 2026, India vs Sri Lanka

Shafali Varma - Smriti Mandhana | Women's Asia Cup Final 2026, India vs Sri Lanka

Sakal

Updated on

Women's Asia Cup Final 2026, India vs Sri Lanka: महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत आणि श्रीलंका संघात दुबईमध्ये अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारताच्या सलामी जोडी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा (Shafali Verma & Smriti Mandhana) यांनी कमालीचा खेळ करताना इतिहास घडवला आहे. त्यांनी विश्वविक्रमी शतकी भागीदारी केली आहे.

त्यांच्या या शतकी भागीदारीमुळे भारताने श्रीलंका महिला संघासमोर विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हे महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यातील सर्वात मोठे लक्ष्य आहे.

Shafali Varma - Smriti Mandhana | Women's Asia Cup Final 2026, India vs Sri Lanka
Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com