

Shafali Verma World Records during India Women vs Zimbabwe Women 2nd T20I
Sakal
India Women vs Zimbabwe Women 2nd T20I: भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेविरुद्ध दुसरा टी२० सामना सहज जिंकला. या सामन्यात शफाली वर्माने वादळी अर्धशतक करत दोन विश्वविक्रम केले.
भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी (१८ ऑक्टोबर) झिम्बाब्वे महिला संघाला दुसऱ्या टी२० सामन्यात ९ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह भारताने ३ सामन्यांची टी२० मालिकेतही २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या विजयात शफाली वर्माने वादळी अर्धशतकासह मोलाचा वाटा उचलला. तिने अर्धशतकासह दोन विश्वविक्रमही (Shafali Verma World Records) केले.