Shaheen Afridi challenges India ahead of Asia Cup 2025
esakal
Shaheen Afridi warns India ahead of Asia Cup 2025 possible final : आशिया चषक स्पर्धेत दोन वेळा भारताकडून वस्त्रहरण झाल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट संघाला अक्कल आलेली दिसत नाही. सुपर ४ मध्ये विजय मिळवून त्यांना जग जिंकल्यासारखं वाटू लागलं आहे आणि त्यामुळेच फायनलचे स्वप्न पाहून ते आता टीम इंडियाला धमकी देत आहेत. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने काल पत्रकार परिषदेत भारतीय संघाला आव्हान दिले आहे आणि त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.