Shahid Afridi sparks fresh controversy with remarks on Indian players’ patriotism
esakal
आशिया चषक २०२५ मध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी १४ सप्टेंबर रोजी दुबईत होणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर IND vs PAK लढतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, पण सरकारने परवानगी दिली.
सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीने पुन्हा वादग्रस्त विधान करून भारतीय चाहत्यांना डिवचले.
India vs Pakistan clash controversy sparked by Shahid Afridi : आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारताचा पुढील मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध येत्या रविवारी होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी चिघळले आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळूच नये यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली गेली. पण, केंद्र सरकराने बहुदेशीय स्पर्धांमध्ये IND vs PAK लढतीला हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळेच आता १४ सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लढत होणार हे निश्चित आहे. त्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने गरळ ओकली आहे.