Shardul Thakur 2 Wickets: लॉर्ड शार्दुल! दोन चेंडूत इंग्लंडला दिले दोन धक्के, भारताच्या आशा पल्लवित; Video

India vs England, 1st Test: पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंड भारताविरुद्ध वरचढ ठरताना दिसत होते. पण याचवेळी शार्दुल ठाकूरने दोन चेंडूत दोन विकेट्स घेत भारताच्या आशा पल्लवित केल्या.
Shardul Thakur | England vs India, 1st Test
Shardul Thakur | England vs India, 1st TestSakal
Updated on

हेडिंग्लेमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना अत्यंत रोमांचक स्थितीत आहे. शेवटच्या दिवशीही दोन्ही संघ विजयासाठी जीवाची बाजी लावताना दिसत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेतील हा पहिला सामना असल्याने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

दरम्यान, इंग्लंडला शेवटच्या दिवशी सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रावली यांनी दमदार सुरूवात करून दिली होती. पण भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने कमाल केली असून भारताच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

Shardul Thakur | England vs India, 1st Test
ENG vs IND: शार्दुल ठाकूरचा तो कॅच जो रुटसाठी ठरला विश्वविक्रमी! द्रविडच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com