माजी क्रिकेटपटू शिखर धवनला बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणात ED कडून समन्स बजावले आहे.
धवनचा जबाब "प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट" (PMLA) अंतर्गत नोंदवला जाणार आहे.
'1xBet' या बेटिंग अॅपच्या जाहिरातींमुळे त्याचे नाव या तपासात जोडले गेले आहे.
Shikhar Dhawan ED questioning latest update on betting app scam : भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.