

Shimron Hetmyer Fifty | T20 World Cup 2026
Sakal
Shimron Hetmyer’s 19-Ball Fifty: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर-८ फेरीत सोमवारी झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सामना होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत असून पहिल्याच डावात वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) प्रेक्षकांना चौकार - षटकारांची बरसात पाहण्याची संधी दिली आहे.
त्याने अत्यंत आक्रमक फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) गोलंदाजांना बेजार केले. त्याने आक्रमक अर्धशतक केले. पण त्याचं शतक थोडक्यात हुकलं. पण त्याच्या खेळामुळे वेस्ट इंडिजने (West Indies) अडीचशे धावांचा टप्पा पार केला.