

Shivam Dube
Sakal
Shivam Dube travelled from Ahmedabad to Mumbai by train : भारतीय क्रिकेट संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकून देण्यात अनेक खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला, ज्यात अष्टपैलू शिवम दुबेचाही (Shivam Dube) समावेश आहे. दुबेने खालच्या फळीच केलेली फटकेबाजी भारतीय संघासाठी अनेकदा महत्त्वाची ठरली.
दरम्यान, त्याच्यासाठी हा दुसरा टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) विजय ठरला. तो २०२४ मध्ये जिंकलेल्या टी२० वर्ल्ड कपमधील भारतीय संघाचाही भाग होता. भारतीय संघाने रविवारी (८ मार्च) अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताने ९६ धावांनी विजय मिळवला आणि भारताने सलग दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला.
मात्र, यानंतर शिवम दुबे चक्क ट्रेनने (Train Journey) त्याच्या घरी मुंबईला परतला. त्याने विमानाने न जाता ट्रेनचा पर्याय का निवडला याचीही खुलासा केला आहे.