

Shreyas Iyer Borrows Cameraman's Shoes | IPL 2026
Sakal
IPL 2026 Shreyas Iyer Viral Video: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत पंजाब किंग्स संघाची कामगिरी अफलातून झाली आहे. आयपीएलच्या या हंगामाचा पहिला टप्पा संपला आहे, विशेष म्हणजे पहिला टप्पा संपल्यानंतरही पंजाब किंग्स (Punjab Kings) अद्याप अपराजित आहेत.
या हंगामात अद्याप एकही सामना पराभूत न होणारा तो एकमेव संघ आहे. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात पंजाबची कामगिरी चांगली होत असून तो स्वत: देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अशातच त्याचा एक गमतीशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.