Asia Cup 2025 संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यर प्रथमच व्यक्त झाला; "पात्र असूनही संधी मिळाली नाही, खूप त्रास होतोय"

Shreyas Iyer Opens Up On Asia Cup 2025 Omission : आशिया कप २०२५ साठी भारतीय संघ जाहीर झाला आणि त्यात श्रेयस अय्यरला स्थान न मिळाल्याने क्रिकेटविश्वात मोठी चर्चा रंगली आहे. संघातून वगळल्यानंतर अय्यरने प्रथमच मौन तोडत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Shreyas Iyer Breaks Silence After Asia Cup 2025 Snub

Shreyas Iyer Breaks Silence After Asia Cup 2025 Snub

esakal

Updated on
Summary
  • आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघ जाहीर झाला पण श्रेयस अय्यरला संधी मिळाली नाही.

  • आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सचं नेतृत्व करताना त्याने ६०० पेक्षा जास्त धावा करून दमदार कामगिरी केली होती.

  • अय्यरने अखेर मौन सोडत सांगितलं की “पात्र असूनही संघात संधी न मिळणं खूप त्रासदायक आहे.”

Shreyas Iyer reaction after being excluded from India playing XI : आशिया चषक स्पर्धा मंगळवारपासून सुरू होत आहे आणि अजूनही भारतीय संघ निवडीवरून अजूनही आरोपसत्र सुरूच आहे. श्रेयस अय्यरला संधी न मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने आयपीएल २०२५ मध्ये फायनलपर्यंत धडक दिली, त्याने दमदार कामगिरीही केली. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याचे सातत्य कायम होते. असे असूनही श्रेयसला संधी मिळाली नाही. आतापर्यंत भारतीय फलंदाजाने काही प्रतिक्रिया दिली नव्हती, परंतु आशिया चषक स्पर्धेच्या एक दिवस आधी श्रेयसने मौन सोडेले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com